बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या हत्येतील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी कुटुंबीयांना दिले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा : बीड प्रकरणी अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
संतोष देशमुख यांचा आज तेराव्याचा दिवस आहे. या दिवशी सकाळी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि गावातून निघाले. यावेळी उपमुख्यमंत्री जात असताना मस्साजोग ग्रामस्थांनी थांबवले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थांबवून ग्रामस्थांनी मागणी केली. धनंजय मुंडेंना काढून टाका. धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊन नका. धनंजय मुंडेने बीड जिल्हा नासवून टाकला आहे असे मस्साजोग ग्रामस्थांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. मात्र सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊन नका असा आक्रोश मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला.