संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे टार्गेट

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे टार्गेट

बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर आहेत. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देवू नये तसेच मुंडे यांची मिंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मूकमोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी केली. यावेळी भाजपाचे सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना घरचा आहेर देत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : धस यांनी माझी माफी मागावी; प्राजक्ताने सोडले मौन

पंकु ताई, तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये आलात. मला मान्य आहे की मुंडेसाहेबांची जयंती असल्याने तुम्ही तिकडे जाणं गरजेचे आहे. पण वाड वाकडी करून तुम्ही एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला यायला हवं होतं. तुम्ही का आला नाही? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना केला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मूकमोर्चाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावेळी मोर्चाला संबोधित करताना सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या बीडमधील राजकीय कार्याची चिरफाड केली.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

देशमुख हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात धनंजय मुंडे यांच्या कार्यपध्दतीवर टिका झाल्याने त्याचे पडसाद महायुती सरकारमध्ये उमटण्याची शक्यता आहे. याआधी शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे यामुद्यावरून आता महायुती सरकारमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया येत असल्याने सरकारमध्ये खटके उडू लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number