Dhananjay Munde : ‘तौहीद खान मृत्युप्रकरणी नशेखोरी हे महत्त्वाचं कारण’; धनंजय मुंडेंनी विधीमंडळात तरुणांमध्ये वाढत्या नशेखोरीवर व्यक्त केली चिंता

मुंबई : परळीतील मृत तौहीद खान हत्याप्रकरणी आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. तौहीद हा घरातील कमवता व्यक्ती असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण […]

Dhananjay Munde : ‘तौहीद खान मृत्युप्रकरणी नशेखोरी हे महत्त्वाचं कारण’; धनंजय मुंडेंनी विधीमंडळात तरुणांमध्ये वाढत्या नशेखोरीवर व्यक्त केली चिंता

मुंबई : परळीतील मृत तौहीद खान हत्याप्रकरणी आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. तौहीद हा घरातील कमवता व्यक्ती असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले असून बीड जिल्ह्यातील तरुण मुलांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

हेही वाचा : Nana Patole : सरकारच पितळ उघडं पडलं; चेंबूरमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर नाना पटोले सरकारवर बरसले

धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी परळीतील मृत तौहीद खान हत्याप्रकरणी चर्चा केली असून, तौहीद खान कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत तात्पुरती आर्थिक मदत केली होती. तसेच त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

प्रकाश सोळंकेना मुस्लिम समाजाच्या न्यायाची अडचण की द्वेष?

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी तौहीद खानप्रकरणी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला असता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना बोलायला का दिले?, म्हणत हरकत घेतल्याने प्रकाश सोळंके यांना मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याची अडचण आहे का?, मुस्लिम समाजाचा द्वेष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, तालुका सभापती यांनी मात्र प्रकाश सोळंके यांचे म्हणणे धुडकावून लावत, स्वतः अध्यक्षांनी मुंडेना बोलण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number