म्हणून ‘तुळजा भवानी संस्थाना’वर भाविक नाराज

कोरोना विषाणुने जगभरातील 77 देशांत दहशत पसरवली आहे. या विषाणुचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. या विषाणुचा संसर्ग होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिर संस्थानांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र तुळजा भवानी मंदिर संस्थान या बाबत अजूनही उदासिन आहे. चीनमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत जगभरातील 3308 रुग्ण मयत झाले आहेत. […]

म्हणून ‘तुळजा भवानी संस्थाना’वर भाविक नाराज

कोरोना विषाणुने जगभरातील 77 देशांत दहशत पसरवली आहे. या विषाणुचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. या विषाणुचा संसर्ग होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिर संस्थानांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र तुळजा भवानी मंदिर संस्थान या बाबत अजूनही उदासिन आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणुने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत जगभरातील 3308 रुग्ण मयत झाले आहेत. तर भारतभराच 29 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतातील वेगवेगळ्या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. अशावेळी महाराष्ट्रातील पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी या सह इतर मंदिर संस्थानांनी कोरोना बाबत काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सगळेच जण या आजाराचा बिमोड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलत असताना महाराष्ट्रची आई तुळजाभवानी मंदिर प्रशासन मात्र बंदोबस्ताच्या बाबतीत उदासीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

मंदिरात फक्त 2 तासाला स्वच्छता करण्याचे आदेश देऊन मंदिर प्रशासन निवांत झालं आहे. या मंदिर परिसरात ना कुठले जनजागृतीचे बोर्ड लावले आहे, ना कर्मचाऱ्यांना मास्क पुरवले आहेत. तसंच कुठल्याही वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

या आजाराचा बिमोड करावा, यासाठी सगळ्या उपाययोजना कराव्या असे आदेश राज्यशासनाने दिले असले तरी मंदिर प्रशासन सुस्त असल्याने भाविक नाराज झाले आहेत. तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला केवळ राज्यातूनच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यासह देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये येत असतात. त्यामुळे या बाबत लवकर उपाय योजना करणं गरजेचं आहे. मंदिर व्यवस्थापक मात्र या सर्व बाबी करण्यात येतील असं आश्वासन देत आहेत.  भाविकांना कोरोना विषाणुपासून सुरक्षित ठेवण्याबाबत कुठल्याच उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे भाविक नाराज होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number