फडणवीसांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द

देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला आहे. फडणवीस नीतेश राणेंसाठी कणकवलीत प्रचारसभा घेणार होते.

फडणवीसांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द

सिंधुदुर्ग : देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला आहे. फडणवीस नीतेश राणेंसाठी कणकवलीत प्रचारसभा घेणार होते. यासाठी ते हवाई मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार होते. पण पण प्रतिकूल हवामानामुळे फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आहे. नीतेश राणे महायुतीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सभा घेणार होते. ही सभा रद्द झाली असली तरी फडणवीसांनी नीतेश राणेंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

एकाच कुटुंबातले पण वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार

  1. गणेश नाईक भाजपातून तर त्यांचे पुत्र संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून
  2. नीतेश राणे भाजपाकडून तर त्यांचे बंधू नीलेश राणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून
  3. छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर पुतणे समीर भुजबळ अपक्ष
  4. इंद्रनील नाईक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर बंधू ययाती नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून
  5. धर्मरावबाबा आत्राम अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number