आंदोलनाला परवानगी नाकारल्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी सरकारचा निषेध केला. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवालही त्यांनी विचारला.
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो
CAA च्या बाजून संपूर्ण मुंबई आहे.
महाराष्ट्राच्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
आम्हाला लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर जाऊ दिलं नाही, मोर्चा काढू दिला नाही. तुम्ही आम्हाला मोर्चा काढालायला रोखू शकता पण समर्थन करायला रोखू शकत नाही
हिंदूंना सन्मान देणारा एकच देश आहे आणि तो म्हणजे भारत.
या देशात संकुचित लोक तयार झाले हे मला माहीत नाही
ज्यांच्यावर आत्याचार झाले त्यांना आम्ही स्थान दिलं.
पं. जवाहर नेहरू यांनी सांगितले होते की जे बाहेर देशात हिंदू आहे त्यांचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे असं म्हणाले होते
त्यांनी हिंदूंना शब्द दिला होता. हा देश तुम्हाला आधार देईल आणि आज हे तथाकथित नेते लोक बोलतायेत तुम्हाला या देशात स्थान नाही
CAA हा कायदा नाही. ही एक प्रक्रिया आहे. आम्ही आमच्या लोकांना न्याय देतोय.
नागरिकता काढून घेणे नव्हे नागरीकता देणे हा कायदा आहे
देशात आराजकता माजवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत खुर्चीसाठी हे लोक देशात आग लावत आहेत.
या देशात जर घुसखोर राहत असतील तर त्यांना ठेऊन चालेल का?
देशविरोधी नारे देण्यासाठी काँग्रेस उभी आहे.
आम्ही कधी कोणावर आक्रमण केले नाही , पण ज्यांनी आमच्यावर आक्रमण केले त्यांना आम्ही सोडले नाही
कालपर्यंत शिवसेना पण हेच म्हणायची की बांग्लादेशी मुस्लिमांना बाहेर काढा. मात्र सत्ता आल्यावर यांच्या तोंडाना कुलूप लागले , आता बोलायला तयार नाहीत.
खुर्ची वाचवण्यासाठी सावरकरांचा अपमान हे लोक सहन करतात.