Devendra Fadnavis On Thane Case : "अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचचं काम होईल" ठाण्यात परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण प्रकरणी फडणवीसांनी घेतली थेट दखल

ठाण्यात रस्त्यावर का थुंकला असं विचारल्यानंतर एका वृद्धाला परप्रांतिय चालकाने जबर मारहाण केल्याच्या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

Devendra Fadnavis On Thane Case : &quotअशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचचं काम होईल&quot ठाण्यात परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण प्रकरणी फडणवीसांनी घेतली थेट दखल

ठाण्यात एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर मनसे ॲक्शन मोडवर आली असून परप्रांतीय ओला उबेर आणि रिक्षा चालकांना मनसेचा दणका दिला आहे. ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणी परप्रांतीय रिक्षाचालक आणि ओला उबेर चालक मोठ्या प्रमाणात उभे असतात.

यावेळी मनसे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी यांनी या परप्रांतियांना मनसे स्टाईल दणका दिला आहे. त्याचसोबत वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतिय चालकावर एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याप्रमाणे 307 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच रस्त्यावर का थुंकला असं विचारल्यानंतर एका वृद्धाला परप्रांतिय चालकाने जबर मारहाण केल्याच्या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा- Eknath Khadse : ‘एकही मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आलेले नाहीत’, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवरून खडसेंची टीका

यावेळी फडणवीसांनी म्हटलं की, ‘हा विषय अतिशय गंभीर आहे असून यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. तसेच निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम होईल’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन लावला आणि त्या मुजोर चालकावर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ एक वृद्ध दाम्पत्य पायी जात असताना एक परप्रांतीय चालक रस्त्यावर थुंकला. यावर रस्त्यावर का थुंकला असं विचारल्यानंतर परप्रांतीय चालकाने त्या वृद्धाला मारहाण केली. इतकचं नव्हे तर खाली असलेला दगड उचलून त्या वृद्ध व्यक्तीवर मारण्याचा देखील प्रयत्न केला. दरम्यान या झटापटीत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच मनसे कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतिय चालकाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number