देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर

मुंबई, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा पाच दिवसाचा दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान फडणवीस विविध बँका आणि गुंतवणूकदारांशी भेटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सुरु होणाऱ्या जपान दौऱ्यात विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. त्यात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा […]

देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर

मुंबई, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा पाच दिवसाचा दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान फडणवीस विविध बँका आणि गुंतवणूकदारांशी भेटण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सुरु होणाऱ्या जपान दौऱ्यात विविध मान्यवरांची भेट घेणार आहेत. त्यात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यासह इतर महत्वाच्या मंडळींचा समावेश आहे. फडणवीसांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्टेट गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तसेच फडणवीसांचा जपानमध्ये ‘स्टेट गेस्ट’ म्हणून देखील गौरव करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात फडणवीसांसाठी जपानच्या शाही महालमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले असून विविध कंपन्यांसह गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चादेखील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील काही प्रकल्पांच्या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. त्याचबरोबर जपान-इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number