Devendra Fadanvis On CJP : "एक गोष्ट लक्षात आली की…" CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वाखील राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) कडून आंदोलन सुरु करण्यात आले होते. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या चळवळीने आता प्रत्यक्ष आंदोलनाचे रूप घेतले असून, राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. या पार्श्वभूमीवर […]

Devendra Fadanvis On CJP : &quotएक गोष्ट लक्षात आली की…&quot CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वाखील राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) कडून आंदोलन सुरु करण्यात आले होते. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या चळवळीने आता प्रत्यक्ष आंदोलनाचे रूप घेतले असून, राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Cockroach Party Delhi Protest : पेपर फुटीविरोधात जंतर-मंतरवर तरुणांचा एल्गार; ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह या 5 मोठ्या मागण्या

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं ज्या प्रकारे त्याठिकाणी भाषण झाली, नारे लागले, वक्तव्य झाली त्यातून एक गोष्ट लक्षात आली की, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये. तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नकारायच्या.

त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखाडून टाकायच बोलायचं. संविधान केवळ पुस्तकं नाही, त्यातील प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधात आहेत. ते संविधान विरोधात आहेत, त्यामुळे मला असं वाटतं कि आज अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसूबे हे उघडे झालेत. त्यांना कुठलंही समर्थन मिळालेलं नाही."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number