भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 24 तासांची मुदत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यात दिवसेंदिवस विलंब होत आहे. दरम्यान भाजपाने अजित पवारांना सोबत येऊन बहूमत सिद्ध न करता सत्तास्थापन केली आहे. यामुळे शिवसेनेने यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत तक्रार दाखल केली होती. याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार होती. नुकतीच याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या सुनावणीत भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने […]

भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 24 तासांची मुदत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यात दिवसेंदिवस विलंब होत आहे. दरम्यान भाजपाने अजित पवारांना सोबत येऊन बहूमत सिद्ध न करता सत्तास्थापन केली आहे. यामुळे शिवसेनेने यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत तक्रार दाखल केली होती. याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार होती. नुकतीच याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या सुनावणीत भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता 24 तासांची मुदत दिली आहे.

सुनावणीत नेमकं काय घडलं ?

न्यायमुर्ती रमण्णा यांनी निकालाचं वाचन सुरु केले. यामध्ये त्यांनी संसदिय कामकाजात कोर्ट लक्ष घालणार नाही असे जाहीर केले.

यानंतर कोर्ट आणि आमदारांच्या अधिकारांवर विस्तृत चर्चा पार पडली. यासर्व चर्चेनंतर कोर्टाने निर्णय जाहीर केला.

या निर्णयात भाजपाला बहुमतासाठी 24 तासांची मुदत देणात आली आहे. तसेच उद्याच बहुमत चाचणी होणार असे कोर्टाने जाहीर केले.

याचबरोबर कोर्टाने गुप्त मतदान नको, बहुमताचं लाईव्ह प्रसारण करा. तसेच खुलं मतदान घेत त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने भाजपाला दिला आहे.

उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही बहुमत चाचणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number