Devendra Fadanvis: तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांना इंधन मिळेना, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

या सगळ्यात शेतीची पेरणी व अन्य कामांसाठी डिझेलची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. 

Devendra Fadanvis: तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ; शेतकऱ्यांना इंधन मिळेना, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

देशभरात गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानंतर राज्यातील परिस्थिती बिकट होताना दिसत आहे.विशेषत: ग्रामीण भागात अनेकांनी कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल घरी न्यायला सुरुवात केली आहे. रात्रभर रांगा लावूनही लोकांना पेट्रोल आणि डिझेल मिळताना दिसत नाही. यावरुन हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. या सगळ्यात शेतीची पेरणी व अन्य कामांसाठी डिझेलची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत भाष्य केले. ते म्हणाले की,  शेतकऱ्यांने जे काही डिझेल लागेल, ते उपलब्ध करुन द्या, असे आदेश जिल्हा प्रशासनाल दिले आहेत.

त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने उपाययोजन करण्यास सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बूक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच शासकीय यंत्रणांना इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी एकूण उपलब्ध साठ्यातून 10 टक्के इंधन आपत्कालीन यंत्रणा शासकीय कार्यालये, रुग्णवाहिका, पोलीस,अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवांसाठी राखीव ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number