बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्यासह देशभरात शोकाकळा परसली. अनेक राजकीय दिग्गजांसह कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बारामतीमध्ये दाखल झाले. जाणून घेऊया अजित पवार यांच्या निधनाचा घटनाक्रम –
8.45 am – उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा. लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या आज बारामतीत चार सभा होत्या. विमानात अजित पवारांसह सुरक्षारक्षक, वैमानिक यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे १०० फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
विमानात भीषण आग लागली
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल
10.10 am – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम केले रद्द. सर्व कार्यक्रम रद्द करून बारामती इथे होणार रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन. घटनेची माहिती घेतली
10.20 am – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, घटनेची घेतली माहिती. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वर्षा निवासस्थानी पोहोचलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्षा निवासस्थानी दाखल. मंत्री छगन भुजबळ मुंबईहून बारामतीला निघाले. बारामतीत अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातानंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पोलिस दाखल. शरद पवार हे मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी आहेत
10.25 am – महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनात काळ दिवस – संजय राऊत
10.30 am – अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे.
10.34 am – राज्य शासनाकडून सर्व कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बारामतीला जाणार. राज्य शासनाकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती. सर्वच शासकीय कार्यक्रम रद्द
PHOTOS | Visuals from the accident site in the Baramati area of Pune, where an aircraft carrying Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar crashed during landing earlier in the day. Pawar and four others on board were killed in the crash. (Photo Source: PTI; Third Party) pic.twitter.com/hVrCnMmRZo — Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
10.43 am – अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर बारामती बंद; महाराष्ट्रात शोककळा. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच बीड मधील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वतः बंद केल्या.
10.48 am – ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी – नितीन गडकरी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसला आहे. त्यांचे निधन हे वेदनादायी आहे। आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेनी कार्य केले। त्यांना सर्वजण प्रेमाने 'दादा'… — Rajnath Singh (@rajnathsingh) January 28, 2026
11.02 am – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना आदरांजली
11.05 am – अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त; कार्यकर्ते जमायला सुरुवात
11.24 am – अजित पवारांची सासरवाडी असलेल्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा. व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करत वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. गावातील शाळाही देण्यात आल्या सोडून, गावात शोककळा
11.42 am – अजित दादांचे विश्वासू बॉडीगार्ड विदीप जाधव यांचे विमान अपघातात दुःखद निधन
11.45 am – अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती. मेडिकल चेकअपसाठी पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले. घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली.
11.47 am – महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
11.58 am – “महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला नेता आज हरपला. संपूर्ण राज्यावर शोककळा. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. कुटुंबावर मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीच्या दिशेनं निघणार आहोत. अजितदादांचं निधन मनाला चटका लावणारं आहे”, अशी दु:खद भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
12.41 pm – विमानात कोण कोण होते?
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
12.51 pm – अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली. ते घड्याळ त्यांची शेवटची ओळख असल्याचे सिद्ध झाले. यावरून या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.
12.57 pm – महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला; राज ठाकरेंकडून आदरांजली
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी… pic.twitter.com/yIjUC255Af — Raj Thackeray (@RajThackeray) January 28, 2026
1.20 pm – अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झालाय. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लॅंड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. जिथे हे विमान कोसळले तिथे खोलगट भाग आहे. आजुबाजुला झाडं झूडपं आणि उस शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिलीत. कदाचित विमान जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाचे दोन तूकडे झाले आणि कागदपत्रं बाहेर फेकली गेली.
1.23 pm – ‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’ उद्धव ठाकरेंकडून अजित पवार यांना आदरांजली
1. 36 pm – ‘दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील..!’; डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून अजित पवारांना श्रद्धांजली
3.20 pm – अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार. सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार अंत्यसंस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार.
4.23 pm – अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शासकीय दुखवट्याच्या काळात कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
4.26 pm – मनसे अध्यक्ष राज ठाकरे बारामतीच्या दिशेने रवाना. मनसे नेते नितिन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि अविनाश अंभ्यकरसोबत.
4.35 pm – आज रात्री 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शन. उद्या सकाळी 6 ते 9 काटेवाडी येथे अंत्यदर्शन. 11 वाजता विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार होणार.