मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. त्यांनतर कोणकोणती खाती त्यांना देण्यात येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खाती सोपवण्यात आली आहे. यामध्ये उत्पादन शुल्क, क्रीडा मंत्री आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचा समावेश आहे. मात्र अजितदादांकडे असलेलं महत्त्वाचं अर्थखात हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं नसून ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्रक राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सोपवले आहे. परिणामी, राज्यातील आणखी एक महत्त्वाचं खात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातातूतन गेलं असून भाजपच्या पदरी पडलं आहे.
Sunetra Pawar, Deputy CM of Maharashtra and wife of late Ajit Pawar, gets state excise duty, Sports and Youth Welfare, Minorities Development & Aukaf departments The portfolios of Planning and Finance, which were assigned to Late Ajit Pawar, are now being held by Chief Minister… pic.twitter.com/udMdmQxKFe — ANI (@ANI) January 31, 2026
अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती होती. ती पक्षाकडे कायम राहावीत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे केली होती. पंरतू महिन्याभरात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यावर सध्या काम सुरु आहे. सुनेत्रा पवार यांना प्रशासनाचा गाडा हाकण्याचा फारसा अनुभव नाही. त्या पहिल्यांदाच सरकारमध्ये काम करणार आहेत. त्यातच अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.