छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेवर जिवापाड प्रेम करणारी ही भूमी आहे. छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रमुखांचा जीव की प्राण होता. मुंबईनंतर संभाजीनगर येथे शिवसेना वाढली. संभाजीनगरवर भगवा फडकलाच पाहिजे. आधी आपण औरंगाबादचे महापौर म्हणायचो. मात्र आता छत्रपती संभाजीनगरचे महापौर निवडून येणार. संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारे रशीद मामू, जलीलला जलील करायचं आहे. जलील तर पडणार आहे. रशीद मामूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने तिकीट दिले, त्याला दुसरे कुणी भेटले नाही. मतदान रशीद मामूला करणार की शिवसेनेला करणार?, पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का?, मुंबई पकडून ठेवली कारण मुंबई सोन्याची अंडं देणारी कोंबडी असून तिला कापायला निघाले.
छत्रपती संभाजीनगर येथे हिंदुत्वाचे मारेकरी हातपाय पसरत आहेत. संभाजी महाराज यांचा घात घरभेद्यांनी केला. धनुष्यबाण हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केलेल्या तो लाडक्या भावाला पोहोचणार. धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामांचा आहे. आपण ६० जागा जिंकून इतिहास घडवला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि नकली शिवसेना बनली. माझ्यावर का जळता एव्हढे?. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर का पोटसूळ उठले?, स्वप्नातही मला शिव्या देत असतील. मला टीव्ही आणि जाहीर सभेत शिव्या देतात. मी शेतात गेलो तरी पोट दुखते आणि दिल्लीत गेलो तरी पोट दुखते. मी माझ्या बायकोची आणि आईची तळमळ पाहिली आहे. महिलांसाठी काहीतरी करायचं आहे, असं ठरवलं आणि लाडकी बहीण योजना जन्माला आली. लोकं लाडकी बहीण बंद करण्यासाठी कोर्टात गेली, तर याला जोडे दाखवले. महाविकास आघाडीचे सरकार म्हणून 5 स्टार हॉटेल बुक केले होते. ज्या उमेदवारांच्या पाठी महिला त्याचा नंबर पहिला. सुहास बाबरच्या छातीत धडधड होत होती. मात्र माझ्यासाठी थंडीत लाडक्या भावासाठी बहिणी बसल्या होत्या.