जय मालोकारच्या नातेवाईकांची मागणी

अकोल्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

जय मालोकारच्या नातेवाईकांची मागणी

 

अकोला : अकोल्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केली आहे. अकोल्यात मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार घडला होता. यातमध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ कार्यकर्त्यांवर अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेत मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचाही समावेश होता. या प्रकारानंतर जय मालोकार याचा हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यामुळे त्याला रूग्णालयात  दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

 

या घटनेनंतर जयला कुठल्याही प्रकारचा त्रास (आजार) नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जयच्या नातेवाईकांकडून होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number