नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉक्रोज जनता पार्टीसह लाखो विद्यार्थी आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतर गजबजले होते. नीट पेपरफुटीच्या गदारोळात विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर लगेचच, जंतरमंतरवर गेल्या 1 महिनाभरापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आपले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर जंतर-मंतरवर उपस्थित सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले.
अशातच दिल्लीतील जंतर-मंतरवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनावरून घरी परतणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिवगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नॅशनल ब्रेव्ह हिंदू आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यम पंडित यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांना अडवून त्यांची ओळख विचारणे, धर्माच्या आधारावर प्रश्न विचारणे, शिवीगाळ करणे, धमकावणे, माफी मागण्यास भाग पाडणे आणि कथितरित्या मारहाण करताना ते दिसत आहे.
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ स्वतः सत्यम पंडित यांनी त्यांच्या सोशल मीडिया वर शेअर करत, “जंतर-मंतरला जाऊन काही ‘कॉकरोच’ लोकांवर उपचार केले. जे म्हणत होते, ‘करून दाखवा'”, अशी पोस्ट केली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तसेच, दिल्ली पोलिसांवर आंदोलनकर्त्यांबाबत वेगवेगळा दृष्टिकोन अवलंबल्याचा आरोपही केला जात आहे. यापूर्वी जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक, सौरव दास, संजय सिंह, अभिजीत दिपके, राहुल गांधी यांच्यासह अनेकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची चर्चा झाली होती. मात्र, या नव्या व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची भूमिका काय असणार, असा प्रश्न संजय राऊत यांनी सोशल मीडिया वरून विचारला आहे.
@DelhiPolice @Wangchuk66 @SauravDassss @SanjayAzadSln @abhijeet_dipke @RahulGandhi pic.twitter.com/mzOkbIvKPR — Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2026