संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाबाधित

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कलाकार, अनके राजकारणींनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाबाधित

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कलाकार, अनके राजकारणींनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील उपचार घेत आहेत. त्यांनी स्वत:ला गृह विलगीकरण कक्षेत ठेवले असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

महाराष्ट्रातही अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान देशातील रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

राज्यात आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला आजपासून बूस्टर लस देण्यात येणार आहे. तसेच ६० वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बुस्टर डोस देण्यात येईल. मुंबईतील ४५१ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number