चार महिन्यांपासून डांबून ठेवलेल्या हरणाची वनविभागाने सुखरुप सुटका केली आहे. डांबून ठेवण्यात आलेलं हरण हे बारशिंग जातीचं होतं.
विरारमधील हा प्रकार आहे. हरणारा डांबून ठेवणाऱ्या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतलं आहे. प्रथमेश ओघे आणि रुतेश पाटील अशी या दोन आरोपींची नावं आहेत.
विरार पूर्वेतील कोपरी गावात या हरणाला डांबून ठेवण्यात आलं होत. कोपरी गावातील ‘हरी ओम’ बंगल्यात हरणाला डांबून ठेवल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या अधिकारी नम्रता पवार यांनी दुपारी ४ च्या दरम्यान बंगल्यावर धाड टाकली.
यावेळी बंगल्यातील तिसऱ्या मजल्यावर पिंजऱ्यामध्ये हरणाला डांबून ठेवले होते. तसेच या हरणाची शिंग कापल्याचीही धक्कादायक माहितीही समोर येत आहे.