दिपा चौधरीची पोस्ट चर्चेत

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अंकुशने या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे.चित्रपटात अंकुशने साकारलेल्या शाहिरांच्या भूमिकेचं महाराष्ट्र भरात कौतुक पाहायला मिळतंय. तर आता अंकुश चौधरीची […]

दिपा चौधरीची पोस्ट चर्चेत

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अंकुशने या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे.चित्रपटात अंकुशने साकारलेल्या शाहिरांच्या भूमिकेचं महाराष्ट्र भरात कौतुक पाहायला मिळतंय. तर आता अंकुश चौधरीची बायको दिपा चौधरी हिने अंकुशने साकारलेल्या शाहीर साबळेंच्या भूमिकेबद्दल समाज माध्यमांवर व्यक्त झाली.

दीपाने भली मोठी पोस्ट सामायिक करत म्हंटलय की, २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरंतर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पुर्णतः निःशब्द झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली.

बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्यांनी घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे.

चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाही आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे. अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचं यश आहे. असं म्हणत तिने अंकुशच पोस्ट मधून कौतुक केलं. अंकुश सरांचा अभिमान वाटतो, अप्रतिम भूमिका केली, काळजाला भिडणारा चित्रपट अशा कमेंट्स चाहत्यांनी केलेल्या पाहायला मिळतायत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number