‘धुळ्याला दुष्काळी जिल्हा जाहीर करा’

धुळे, २९ ऑगस्ट २०२९, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा जाहीर करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तब्बल २५ दिवस उलटले पण धुळ्यात पावसाचा मागमूस नाही. शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. या परिस्थितीची दखल घ्यावी, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेतील २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून तातडीने द्या, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे. धुळे जिल्ह्यात […]

‘धुळ्याला दुष्काळी जिल्हा जाहीर करा’

धुळे, २९ ऑगस्ट २०२९, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा जाहीर करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तब्बल २५ दिवस उलटले पण धुळ्यात पावसाचा मागमूस नाही. शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. या परिस्थितीची दखल घ्यावी, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेतील २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून तातडीने द्या, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे.

धुळे जिल्ह्यात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहीर करून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम अग्रीम देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांसह धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. धुळ्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पाटील यांनी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेची २५ टक्के रक्कम ही अग्रीम म्हणून तात्काळ देण्यात यावी. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात यावी. अशी मागणी ही आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती

नाशिक जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त ५६ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती गडद झाली आहे. सिन्नर, नांदगाव, मनमाड, येवला या परिसरातील पिकं करपत आहेत. सिन्नर मधील अनेक गावात अद्याप पेरणीच झाले नाहीत. जिल्ह्यात सध्याच्या घडीला ७७ टक्के पाणीसाठा आहे. पण पावसाअभावी सोयाबीन, भाजीपाला, मका, बिट ही पिके करपत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आभाळाकडे नजरा लाऊन बसले आहेत.

कोकणातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत

यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. यामुळे जुलै महिन्यात भाताची लावणी सुरू झाली. पहिल्यांदा शेतीला समाधानकारक असा पाऊस होता मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली आहे. कोरडवाहू भागात शेतीला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेती पूर्णतः पिवळी तसेच लाल झाल्याचे चित्र दिसत असल्याने कोकणातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

देवाला पाण्यात ठेवले

धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे, पिके करपून जात आहेत त्यामुळे शेतकरी हे चिंताग्रस्त झाले आहेत. तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडू दे म्हणून दिंडेगावमध्ये नवलिंगेश्वर महादेवाला लोकांनी पाण्यात ठेवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number