राज्यात १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर

राज्यात १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे […]

राज्यात १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर

राज्यात १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.तिसऱ्या लाटेचा अभ्यास करुन दिवाळीनंतर शाळा सुरु करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्याप संपला नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका सर्वाधिक मुलांना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करुन मुलांचा जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. त्यामुळेच टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरीही ऑनलाईन क्लास सुरु राहणार आहेत.राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी लगेच शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number