अविश्वास प्रस्तावावरील चर्चा बुधवारपर्यंत स्थगित

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अविश्वास प्रस्तावावरील चर्चा उद्या म्हणजेच बुधवार ९ जुलै २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. विरोधकांच्यावतीने गोगोई यांनी हा प्रस्ताव सादर केला. यानंतर प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. चर्चेत पहिल्या दिवशी विरोधकांकडून गौरव गोगोई (काँग्रेस), सौगत राय (तृणमूल काँग्रेस), सुप्रिया […]

अविश्वास प्रस्तावावरील चर्चा बुधवारपर्यंत स्थगित

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अविश्वास प्रस्तावावरील चर्चा उद्या म्हणजेच बुधवार ९ जुलै २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. विरोधकांच्यावतीने गोगोई यांनी हा प्रस्ताव सादर केला. यानंतर प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे.

चर्चेत पहिल्या दिवशी विरोधकांकडून गौरव गोगोई (काँग्रेस), सौगत राय (तृणमूल काँग्रेस), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), डिंपल यादव (समाजवादी पार्टी), अरविंद सावंत (उद्धव ठाकरे गट), मनिष तिवारी (काँग्रेस), एन के प्रेमचंद्रन (रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी), तर सत्ताधाऱ्यांकडून निशिकांत दुबे (भारतीय जनता पार्टी), श्रीकांत शिंदे (शिवसेना), पिनाकी मिश्रा (बीजू जनता दल), नारायण राणे (भारतीय जनता पार्टी), किरेन रिजिजू (भारतीय जनता पार्टी), नवनीत राणा (अपक्ष) या खासदारांनी सहभाग घेतला.

निवडक सदस्यांची भाषणे झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. अविश्वास प्रस्तावावरील चर्चा आता उद्या म्हणजेच बुधवार ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.

पहिल्या दिवशीच्या चर्चेत मणिपूरची कायदा सुव्यवस्था, ईशान्य भारतातील दहशतवाद आणि अंमली पदार्थांची समस्या, महागाई या मुद्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर जनहिताचे कार्यक्रम राबवत असलेले सरकार अविश्वास प्रस्तावाची परीक्षा उत्तीर्ण होईल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. आजच्या चर्चेत खासदारांकडून बोलण्याच्या ओघात काही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच परस्परांच्या राजकीय विरोधकांवर टीका करण्याचे प्रकार घडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number