निर्भयाच्या प्रकरणातील नराधमांना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे.
निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दयेचा अर्ज केला होता. परंतु राष्ट्रपतींनी ती याचिका फेटाळली.
त्यानुसार नवं डेथ वॉरंट जाहीर करण्यात आलं. या वॉरंटनुसार आता गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे.
विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर या नराधमांना फाशी देण्यात येणार आहे.
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला गेला होता.
या सर्व प्रकारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
याआधी या नराधमांना २२ जानेवारी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार होती.