पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पुण्यात एका अज्ञात व्यक्तीकडून थेट पंतप्रधानांना ईमेलद्वारे धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीवर अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून ई मेल द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “मी भारतामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पुण्यात एका अज्ञात व्यक्तीकडून थेट पंतप्रधानांना ईमेलद्वारे धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीवर अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून ई मेल द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “मी भारतामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन” अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्ती कडून करण्यात आला आहे. तसेच आय विल किल नरेंद्र मोदी असा उल्लेख करत मेल व्दारे धमकी देण्यात आली आहे. मेल आयडी वरून धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक तपास अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number