आम्ही बाप चोरला नाही हृदयात पुजला; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडला. यामध्ये, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबत गेलेले आमदारांवर घणाघात टीका केली.

आम्ही बाप चोरला नाही हृदयात पुजला; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी नाशिकमध्ये निर्धार शिबिर पार पडला. या निर्धार शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सोबत गेलेले आमदार आणि भाजपबरोबरच महायुती सरकारवरही घणाघात टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेत म्हणाले की, 'मला दुसऱ्यांचे वडील चोरण्याची गरज नाही'. 

हेही वाचा: 'जमलेल्या माझ्या तमाम…' AIच्या मदतीने नाशकात घुमला बाळासाहेबांचा आवाज

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

हा भव्य निर्धार शिबीर पार पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आज सर्व पक्षांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही. मात्र, काही चोर माझ्या आजोबांचा फोटो वापरत आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा फोटो वापरायला लाज वाटते'. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे काही जुने व्हिडिओ दाखवून सडेतोड उत्तर दिले, 'कालही बाप चोरला, बाप चोरला असे म्हणत त्यांचं रडगाणं सुरू होतं. आम्ही बाप नाही चोरला. आम्ही त्यांना नेहमी हृदयात पुजलं आणि इथून पुढेही पूजत राहू. मात्र, तुम्ही स्वतःचे पाप लपवण्यासाठी त्यांचा आवाज चोरला. त्यासोबतच, त्यांचे विचार सोडले. हे विचार चोरण्याचे पाप आम्ही नाही, तर तुम्ही स्वतः केले आहे'. 

यादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये ते म्हणाले होते, 'मी कधीही काँग्रेससोबत जाणार नाही. जर काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर मी राजकारणातून बाहेर जाईन'. त्याशिवाय, त्यांनी आणखी एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, 'एकनाथ शिंदे यांसारखी माणसं आनंद दिघे यांनी तयार केली आहेत. ते आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये तयार झाले आहेत'. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number