जे आडवं येईल त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही; अजितदादांचा स्पष्ट निर्देश

रस्ता आणि समस्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत.

जे आडवं येईल त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही; अजितदादांचा स्पष्ट निर्देश

पुणे: रस्ता आणि समस्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की, ‘सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला’. पुढे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  ‘रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ’. 

हेही वाचा: जयंत पाटील शरद पवार गटात फार खुश नाही; गिरीष महाजनांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश

यादरम्यान, अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सरकारी रस्ता अडवणाऱ्या लोकांबद्दल सांगितले. तेव्हा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ‘आता तुम्ही कोणाचंही ऐकू नका. चांगलं काम करा. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा. जे आडवं येईल त्याला उचला. त्याशिवाय हे होणार नाही. ज्याच्या मालकीची जागा जात असेल, त्याला मोबदला देऊ. त्याचं नुकसान करायचं आपलं काही काम नाही. जे काय करायचंय ते करून घ्या. पण आपल्या मालकीचा रस्ता, आपल्या डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल, तर त्या रस्त्याकरता परत पैसे देण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही त्यात पाठपुरावा करा. रस्ते छोटे ठेवू नका, मोठेच्या मोठे रस्ते करा. फोर लेन रस्ते करा’. 

 


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number