Sputnik V : ‘स्पुटनिक व्ही’ लसीला DCGI ची मंजुरी

Russian Sputnik V Vaccine : ‘स्पुटनिक व्ही’ या रशियानं विकसीत केलेल्या लसीला भारतातील तज्ज्ञांच्या समितीनंतर ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून परवानगी देण्यात आली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश ठरणार शिवाय भारतात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया – ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका विकसीत ‘कोव्हिशिल्ड’ यानंतर ‘स्पुटनिक व्ही’ ही तिसरी […]

Sputnik V : ‘स्पुटनिक व्ही’ लसीला DCGI ची मंजुरी

Russian Sputnik V Vaccine : ‘स्पुटनिक व्ही’ या रशियानं विकसीत केलेल्या लसीला भारतातील तज्ज्ञांच्या समितीनंतर ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून परवानगी देण्यात आली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मान्यता देणारा भारत
हा ६० वा देश ठरणार शिवाय भारतात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया – ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका विकसीत ‘कोव्हिशिल्ड’ यानंतर ‘स्पुटनिक व्ही’ ही तिसरी लस भारतात वापरण्यात येणार आहे. सोमवारी, केंद्राकडून लसीसंदर्भात
नेमण्यात आलेल्या भारतीय तज्ज्ञांच्या समितीनं ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या आपात्कालीन वापराला हिरवा कंदील दिला. यानंतर आता भारताने ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या लसीच्या वितरणासाठी डॉक्टर रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासहीत एकूण पाच
कंपन्यांसोबत करार केला आहे. शिवाय गेल्या काही दिवसापासून देशामध्ये अनेक राज्यात कोरोना लसीच्या तुटवडा पडत असल्यानं तक्रारी येत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रही बंद करावे लागले होते. ‘स्पुटनिक व्ही’ला भारतात मान्यता
मिळल्यानं थोडा दिलासा नक्की मिळेलं असं दिसत आहे.

ठळक माहिती

‘स्पुटनिक व्ही’च्या वापराला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश
‘डीसीजीआय’कडून ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी
भारताचा डॉक्टर रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासहीत एकूण पाच कंपन्यांसोबत करार
‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ निर्मित लसीचा लवकरच वापर होणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number