वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची वर्णी

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची वर्णी

मुंबई : वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणार. पायाभूत सुविधा भक्कम करण्याबरोबर लोकप्रतिनिधी, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, महिला, वृद्ध, युवक आदी घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांच्या निवडीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे. याआधी हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री म्हणून धूरा सांभाळत होते. मात्र  कोल्हापूरचं पालकमंत्री पद हवं असल्यानं मुश्रीफ नाराज होते. त्यामुळे वाशिम लांब असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रीपद सोडले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी स्वत:कडे ठेवली होती. आता वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दत्तात्रय भरणे यांचे नाव घोषित केले आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number