Dapoli: एसटी कर्मचाऱ्याला धमकी, योगेश कदमांचं नाव घेतलं; दापोलीच्या शिवसेना शहरप्रमुखाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

दापोलीत शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे. एसटी एजन्सी कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप असून योगेश कदमांचं नाव घेतल्याचा दावा आहे.

Dapoli: एसटी कर्मचाऱ्याला धमकी, योगेश कदमांचं नाव घेतलं; दापोलीच्या शिवसेना शहरप्रमुखाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

दापोलीत शिवसेनेच्या शहरप्रमुखाच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच्या खासगी एजन्सीतील कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे दापोली शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांच्यावर करण्यात आला आहे. या कथित संभाषणात बसच्या ड्युटी आणि अलोकेशनवरून कर्मचाऱ्याला गंभीर इशारा दिल्याचा दावा केला जात आहे.

ड्युटी रद्द करण्यावरून वाद

दापोली एसटी आगारातील ई बसेसच्या व्यवस्थापनाचे काम मोरया ट्रॅव्हल्स या खासगी एजन्सीकडे आहे. याच एजन्सीच्या एका कर्मचाऱ्याशी रेळेकर यांचा फोनवरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या ड्युटी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वाहनांच्या ड्युटीमध्ये बदल किंवा ड्युटी रद्द केल्यास गाड्यांचे नुकसान करण्याची भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यासह स्टाफला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचेही या संभाषणातून स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे.

संभाषणात योगेश कदमांचं नाव

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे नाव घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या आदेशाचा संबंध योगेश कदम यांच्या आदेशाशी जोडणारे वक्तव्य रेळेकर यांनी केल्याचे या क्लिपमधून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला असून, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपची अधिकृतता अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्याचा संपूर्ण संदर्भ अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होऊ शकतो.

पप्पू रेळेकरांचं स्पष्टीकरण

या प्रकरणावर प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. कर्मचाऱ्यांच्या ड्युटी रद्द करण्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही, त्यामुळे आपण संतापलो असल्याचे त्यांनी सांगितले. रागाच्या भरात काही चुकीचे शब्द बोलले गेले असतील, मात्र कोणाला प्रत्यक्ष नुकसान पोहोचवण्याचा आपला हेतू नव्हता, असा दावा रेळेकर यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number