दादा गटाला कसली भीती?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्यपरिस्थिती ही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निर्णयावर येऊन ठेपली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर आता हे अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेक विश्लेषकांच्या मतांवरून हे पद सुप्रिया यांच्याकडे जाण्याची दात शक्यता दिऊन येत आहे. आणि याच शक्यतेमुळे दादा गट सध्या हादरला आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत घोषणा केली. या घोषणेनंतर […]

दादा गटाला कसली भीती?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्यपरिस्थिती ही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निर्णयावर येऊन ठेपली आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर आता हे अध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनेक विश्लेषकांच्या मतांवरून हे पद सुप्रिया यांच्याकडे जाण्याची दात शक्यता दिऊन येत आहे. आणि याच शक्यतेमुळे दादा गट सध्या हादरला आहे.

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ सुरु झालं आहे. या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनंतर आता सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याचा अंदाज अनेकांकडून व्यक्त होत असल्याने दादा गट धास्तावल्याचे दिसून येत आहे.

दादा गटाला नेमकी भीती कशाची?
अजित पवार हे स्वतःला शरद पवारांचे वारस समजतात. पण, आधीपासूनच सुप्रिया यांना राजकारणात स्थापित करण्याकडे पवारांचा कटाक्ष होता. तसेच राजकीय वारस म्हणून शरद पवारांच्या मनात सुप्रियाच असल्याचे समोर येत आहे. आणि अनेक विश्लेषकांकडून आलेल्या प्रतिक्रियांवरून एकंदरीतच अध्यक्षपदाची अध्यक्षपदाची नवी जबाबदारी सुप्रिया सुळे यांना मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, जर सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्या तर शरद पवारांचा राजकीय वारसासुद्धा सुप्रिया यांच्याकडेच जाईल. यामुळे अजित पवार सुप्रियांच्या हाताखाली काम करतात असं चित्र देशापुढे उभे राहील. जर असे घडले तर अजित पवार यांच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती दादा गटाला वाटत आहे. तसेच ‘जसे पेराल तसे उगवेल’ या म्हणीप्रमाणेच अजित पवारांनी आजवर ज्यांचा पाणउतारा केला त्यांना संधी मिळण्याची भीतीदेखील त्यांना वाटत आहे. सुप्रिया या जर अध्यक्षपदाच्या मानकरी ठरल्या तर ताई गटाकडून दादा गटाचे खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आणि भीती अजित पवारांना वाटते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number