अवकाळी पावसामुळे शेतमाल खराब

विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्यांना दिला होता. शेतकऱ्यांनी शेतातील कापणीला आलेले पीक बाजारपेठेत विकण्याचा सल्लाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला. पण असं असताना नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होत आहे.अवकाळीमुळे शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस शेतीमाल बाजारात आणू नये असे आवाहन मार्केटच्या प्रमुखांनी शेतकऱ्यांना केला आहे. यावेळी लाल […]

अवकाळी पावसामुळे शेतमाल खराब

विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्यांना दिला होता. शेतकऱ्यांनी शेतातील कापणीला आलेले पीक बाजारपेठेत विकण्याचा सल्लाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला. पण असं असताना नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होत आहे.अवकाळीमुळे शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस शेतीमाल बाजारात आणू नये असे आवाहन मार्केटच्या प्रमुखांनी शेतकऱ्यांना केला आहे.

यावेळी लाल मिरचीचे पीक भरपूर आले आहे. पण लाल मिरची ठेवण्यासाठी शेड नसल्यामुळे लाल मिरचीची हजारो पोती भिजत असल्याची स्थिती आहे. आणखी दोन दिवस अवकाळी पाऊस येणार असल्याने शेतमाल खराब होण्याची भीती आहे. मागील अनेक वर्षापासूनची मागणी असताना नागपूरच्या कळमना एपीएमसीमध्ये अतिरिक्त शेड तयार करण्यात आलेले नाही.

अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा मोठ्या प्रमाणात एपीएमसी मध्ये विक्रीला आणला आहे. अवकाळी पावसामुळे संत्र्याचे दरही कमी झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा एपीएमसीमध्ये आणत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी संत्र्याचे भाव पाडले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number