हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याऊ-म्याऊ करून डिचवलं. त्यामुळे शिवसेना आणि राणे कुटुंब आमने-सामने आले. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उडी मारली आहे. नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यामध्ये ट्विटर वॉर जुंपली असून मूळ छायाचित्रात बदल करून परस्परांवर पातळी सोडून टीका केली आहे.
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
नवाब मलिक यांनी मांजर आणि कोंबडीचा फोटो मॉर्फ करत ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी केलेल्या ट्विटचा रोख हा नितेश राणे यांच्यावर होता. त्यांनंतर आता नितेश राणे यांनी एक डुकराचा फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये त्यांनी मलिकांचा चेहरा मॉर्फ केला आहे. तसेच ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण? असे लिहिले.
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR— Nitesh Rane (@NiteshNRane) December 25, 2021
विधिमंडळाच्या पायरीवर आदित्य ठाकरे येताच नितेश राणे यांनी म्याऊ-म्याऊ आवाज काढला. याप्रकाराचे नितेश राणे यांनी समर्थनसुद्धा केले आहे. शिवसेना पूर्वी वाघ होती, आता तिची मांजर झाली आहे. त्यामुळे मी काहीही गैर केले नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या प्रकारानंतर शिवसेना आमदारांनी मुद्दा सभागृहात उपस्थित केला. शिवसेना आमदारांनी विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी विधानसभेत केली आहे.