कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी पती आपल्या पत्नीसोबत कारमधून प्रवास करत होता. त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली आणि तिला बाहेर ढकलले. त्यानंतर त्याने तिचे केस ओढून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा ती महिला मदतीसाठी ओरडू लागली, तेव्हा जवळच लोक जमा झाले. त्यांनी आरोपी पतीला थांबवले आणि त्या दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवले.
त्यानंतर आरोपी पतीने गाडी एका खेळाच्या मैदानाकडे नेली, जिथे तो गाडीतून उतरला आणि एका धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिला ठार मारले. त्यानंतर तो पुन्हा गाडीत बसला आणि तिच्या अंगावरून गाडी चालवली. या घटनेचे व्हिडिओदेखील समोर आला आहे.
हेही वाचा – Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरील उड्डाणांमध्ये होणार वाढ, 30 नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू
ही घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील बल्लुर्गी गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सकाळी आपल्या पत्नी सोबत गणगपुरा या तीर्थक्षेत्राकडे जात होता. दोघेही मारुती सुझुकी एर्टिगा कारमधून प्रवास करत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाटेत दोघांमध्ये वाद झाला. यानंतर अक्षयने पत्नीला गाडीतून बाहेर ढकलले.
त्यानंतर अक्षयने रस्त्याच्या मधोमध पत्नीचे केस पकडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मग त्याने मित्राला गाडीत बसवले आणि गाडी शेताच्या दिशेने नेली. तिथे त्याने आपल्या पत्नीला जमिनीवर झोपवले आणि तिच्या अंगावरून गाडी चालवली. घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातील माहितीनुसार, ही घटना केवळ रागाच्या भरात घडलेली नसून ती पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.