सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे विद्या चव्हाण अडचणीत सापडल्या आहेत. विलेपार्ल्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूनेचा छळ केल्यामुळे पोलिसांकडून भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, […]

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यामुळे विद्या चव्हाण अडचणीत सापडल्या आहेत.

विलेपार्ल्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूनेचा छळ केल्यामुळे पोलिसांकडून भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या चव्हाण यांच्या सुनेला पहिली आणि दुसरीही मुलगी झाली. यामुळे कुटुंबियांकडून छळ केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला आहे.

परंतु सुनेने केलेले आरोप विद्या चव्हाण यांनी फेटाळले आहेत.

दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांच्याकडून आलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number