अनिल देशमुखांविरोधात सीबीआयला चौकशीचे आदेश

दिल्लीतील न्यायालयाने सीबीआयला कागदपत्र लीक प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील वसुलीच्या आरोपांची चौकशी सुरू असून सीबीआयच्या प्राथमिक तपासात देशमुख यांना क्लीन चीट देण्यात आलाी होती. आणि आता न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयलने […]

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयला चौकशीचे आदेश

दिल्लीतील न्यायालयाने सीबीआयला कागदपत्र लीक प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील वसुलीच्या आरोपांची चौकशी सुरू असून सीबीआयच्या प्राथमिक तपासात देशमुख यांना क्लीन चीट देण्यात आलाी होती. आणि आता न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

सीबीआयलने चार आठवड्यांमध्ये अहवाल द्यावा, असे आदेश दिल्लीतील न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. सीबीआयने गाडीचे इंजिन सोडन दिले, फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांना अटक केली  आहे. कारण इंजिन किंवा घोडा ओढल्याशिवाय गाडीची स्वारी नसते, असे म्हणत अनिल देशमुख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

२९ ऑगस्ट रोजी, सीबीआयने प्राथमिक तपासाचा अहवाल लीक झाला. देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न  केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यईल. तसेच याप्रकरणी अन्य व्यक्तींचाही सहभाग होता का, याचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number