‘न्यायालयाला अपात्रतेचा अधिकारच नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील, अशी मतं घटनातज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असताना मात्र कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही बाजुंचा […]

‘न्यायालयाला अपात्रतेचा अधिकारच नाही’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील, अशी मतं घटनातज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असताना मात्र कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. कोणत्याही क्षणी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील,अशी मतं घटना तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला,तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निकालातून अपात्र होईल असं वाटत नाही. अपात्रतेची जी कार्यवाही होती.त्यावेळीचे जे उपाध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयाने जी स्थगिती दिली होती. ती स्थगिती कदाचित उठवली जाईल,अशी परिस्थिती आहे. हे प्रकरण राज्यपाल आणि कार्यकारिणी मंडळ यांच्यातील आहे. त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.

तर राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट भाष्य करणार नाही. राज्यपालांचा निर्णय बदलला जाईल असं वाटत नाही कारण घटना होऊन गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता. राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला स्थगिती दिली होती ते उठवला जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number