राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बदनामीच्या खटल्याप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांचा १५ हजार रुपयांचा जामीन न्यायलयाने मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझवरील ड्रग्जप्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल केला. या बदनामीच्या खटल्यात नवाब मलिकांना १५ हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केल्यामुळे मलिकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांनी अनेक खुलासे समोर आणले आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रुझवर येण्यासाठी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मेहुण्याचा हात असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यामुळे मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल केला. मोहित कंबोज यांनी मलिकांविरोधात दाखल केलेल्या खटल्यात मलिकांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मलिकांचा १५ हजारांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.