Corona Virus ; भारतात कोरोनाचा पहिला बळी

जगभरात Corona virus ची दहशत पसरली आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसने आता भारतातही थैमान घातले आहे. यामुळे अनेक मोठमोठे उत्सव, समारंभ, सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. चीननंतर भारतात याचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. भारतात 70 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यामधील कर्नाटक येथील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमधील […]

Corona Virus ; भारतात कोरोनाचा पहिला बळी

जगभरात Corona virus ची दहशत पसरली आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसने आता भारतातही थैमान घातले आहे. यामुळे अनेक मोठमोठे उत्सव, समारंभ, सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत.

चीननंतर भारतात याचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. भारतात 70 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यामधील कर्नाटक येथील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकमधील कलबुर्गी येथे राहणारे 76 वर्षीय मोहम्मद हुसैन सिद्दिकी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची देशातील ही पहिली घटना आहे.

सिद्दिकी यांना कोरनाची लक्षणे जाणवू लागल्याने ते उपचारासाठी तेलंगणाच्या रूग्णालयात गेले होते. तेथे कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.

तसेच आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी याची माहिती तेलंगणा सरकारला दिली. आता सिद्दीकी हे कोणाकोणाच्या सानिध्यात आले होते. याचा तपास सुरू आहे.

भारतात दिवसेंदिवस कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. राज्यात कोरोनाचे 14 रूग्ण आढळले आहेत. यामुळे सर्व स्तरावर घबराट पसरली आहे.

यामुळे राज्यात काही ठिकाणी व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. जगभरात कोरोनाचे सुमारे 1,25,293 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4,600 जणांचा यात बळी गेला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number