मुंबई , नवी मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा पंधरवडा

मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे . कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तज्ज्ञांनी या परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.विविध पातळ्यांवर सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आलेल्या करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे.मे […]

मुंबई , नवी मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा पंधरवडा

मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे . कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला लागल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तज्ज्ञांनी या परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.विविध पातळ्यांवर सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आलेल्या करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे.मे महिन्यात शहरात पाच हजार ८८८ रुग्णांची नोंद झाली होती. यातील चार हजार ११४ रुग्ण हे मागील १५ दिवसांत नोंदवण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत ही वाढ तिप्पट असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या लाटेनंतर मार्च व एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्या अतिशय कमी झाली होती. मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत तीन जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मात्र या दिवसांत रुग्णवाढीचा वेग तुलनेने कमी होता. दरम्यान, आतापर्यंत एक कोटी ३४ लाख ४६ हजार ९६ जणांनी संस्थात्मक विलगीकरण पूर्ण केले असून, ३७ हजार ८२८ रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३००च्या आत आहे, तर लक्षणे नसलेले रुग्ण दोन हजार ६४३ एवढे आहेत.

नवी मुंबईत आठवड्याभरात ३०० कोरोना रुग्णसंख्याची वाढ

नवी मुंबईत आठवड्या भरात ३०० कोरोना रुग्णसंख्याची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने नवी मुंबई महानगरपालिका रुग्ण वाढी संदर्भात सज्ज झाली आहे. दररोज चार हजारांपेक्षा जास्त चाचण्या महानगरपालिका करत आहे. जून महिन्यापासून नवी मुंबईत तीनशे पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी ७६ तर गुरुवारी ५८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण सापडल्याने नवी मुंबई महानगरपालिका आता सज्ज झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी देखील यीग्य ती खबरदारी घावी अशी आश्वासने देखील नागरिकांना दिली जात आहेत. नागरिकंनी देखील योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number