कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची फोनद्वारे चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांनी कोरोनासंदर्भात काही मोजक्या पण महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबतची माहिती स्वत राज ठाकरे यांनी दिली. काय म्हणाले राज ठाकरे ? कंपन्यांनी कामगारांचा पगार कापू नये. हातावर पोट असणाऱ्यांसाठी सरकारने यंत्रणा उभी करावी. हॉटेल बंद करा, पण किचन सुरु ठेवा. ज्यामुळे सर्वसामान्यांना […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची फोनद्वारे चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांनी कोरोनासंदर्भात काही मोजक्या पण महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबतची माहिती स्वत राज ठाकरे यांनी दिली.

काय म्हणाले राज ठाकरे ?

कंपन्यांनी कामगारांचा पगार कापू नये. हातावर पोट असणाऱ्यांसाठी सरकारने यंत्रणा उभी करावी. हॉटेल बंद करा, पण किचन सुरु ठेवा. ज्यामुळे सर्वसामान्यांना होम डिलिव्हरी सुरु राहिल. लोकांनी अन्न मिळेल याची काळजी घ्या.

हातावर स्टॅम्प मारलेले बाहेर फिरतायेत. त्यांना गांभीर्य नाही. मुख्यमंत्र्यांसोबत काल रात्री बोलणं झालंय. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सूचना केल्यात. लोकांनी ऐकलं नाही, तर कठोर पाऊलं उचलावी लागतील, ही वेळ सरकारवर आणू नये,असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यासंदर्भातील सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या. तसेच आतापर्यंत कोरोना विरुद्धात लढण्यासाठी जे काही पाऊलं उचलंली त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरे यांनी आभार मानले.

आपातकालीन कर्मचाऱ्यांचे आभार

यावेळेस राज ठाकरे यांनी आपातकालीन सेवा देणाऱ्या सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानताना निशब्द झाले. सरकारकडे यंत्रणा कमी आहे, त्यामुळे जनतेने याचा विचार करा, असं आवाहन केलं आहे.

तसेच जनतेने घरात बसणं हेच महत्वाचं. लवकरात लवकर हे संकट टळो, असा आशावाद त्यांनी यावेळेस व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number