कोरोनाची साथ संपली

गेली बरीच वर्षे कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. संपूर्ण जगापुढे कोरोना डोकेदुखी बनला होता. परंतु आता कोरोनाची साथ संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोरोनाचा काळ आठवला तरी प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. कोरोनामुळे लागलेलं कडक लॉकडाऊन, निशब्द आकाश, चार भिंतीत कोंडलेलं आयुष्य, दाराबाहेर भयाण शांतता आणि ॲम्बुलन्सचा ककर्श आवाज. घड्याळाच्या काट्यावर धावणारी आणि […]

कोरोनाची साथ संपली

गेली बरीच वर्षे कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. संपूर्ण जगापुढे कोरोना डोकेदुखी बनला होता. परंतु आता कोरोनाची साथ संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

कोरोनाचा काळ आठवला तरी प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. कोरोनामुळे लागलेलं कडक लॉकडाऊन, निशब्द आकाश, चार भिंतीत कोंडलेलं आयुष्य, दाराबाहेर भयाण शांतता आणि ॲम्बुलन्सचा ककर्श आवाज. घड्याळाच्या काट्यावर धावणारी आणि लोकलच्या वेळापत्रकावर चालणारी मुंबईदेखील शांत झाली होती. या कोरोनाच्या लाटेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अनेकांना नातेवाईक गमावावे लागले. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या.

कोरोनाने अवघ्या देशात अराजकता माजवली होता. रुग्णालयात मृतदेहाचे खच पडले होते. अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मनाला सल लावणारी गोष्ट म्हणजे आपल्या माणसाचं अंत्य दर्शनही घेता येतं नव्हतं. रुग्णालय कर्मचारीचं त्यांचं अत्यसंस्कार करत होते. परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची साथ संपली असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच कोरोनापासूनच्या सुटकेचा निश्वास सोडता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number