देशात पुन्हा कोरोना वाढ

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोनाच्या ३ हजार ३०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आकड्यासह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ९८०वर […]

देशात पुन्हा कोरोना वाढ

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोनाच्या ३ हजार ३०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आकड्यासह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ९८०वर पोहोचली आहे.

देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोना  संक्रमणाबाबत सावध रहाण्याचा इशारा दिला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा बंधने नको असतील तर कोरोनाबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

कोरोना रुग्णवाढ

दरम्यान, देशात पुन्हा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने तीन हजारांचा आकडा पार केला आहे. बुधवारी देशात ३ हजार ३०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ हजार ५६३ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ३९ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १६ हजार ९८० इतकी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number