कंत्राटदार की अभियंता? हर्षल पाटलाच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे.

कंत्राटदार की अभियंता? हर्षल पाटलाच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कंत्राटदारांकडून बिल वेळेत येत नसल्याचा आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच, सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी गावात राहणाऱ्या हर्षल पाटील यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. एकीकडे, आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केले तर दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी असा दावा केला आहे की, 'हर्षल पाटील हा कंत्राटदार नसून अभियंता आहे'. 

काय म्हणाले जयंत पाटील?

बुधवारी रात्री, शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हणाले की, 'आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत'.

'सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे. एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा', अशी मागणी देखील यावेळी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली.

आमदार जयंत पाटलांचे आरोप खोडून काढले

मंत्री गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक दावा केला की, 'जो आरोप केला जात आहे की हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे थकले होते, यात काहीही तथ्य नाही. याविषयी, मी स्वत: जिल्हा परिषदेचे सीईओ आणि कार्यकारी अभियंत्याशी संवाद साधला. हर्षलला कोणतेही काम जिल्हा परिषदेकडून देण्यात आले नव्हते. कोणतेही बिल पेंडिंग नाहीत. जर त्यांनी सबलेट काम घेतले असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही'. 

पुढे, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 'हर्षल पाटील यांच्या नावावर कोणतीही कामे नाहीत. जल जीवन मिशन योजनेची कोणतीही बिले प्रलंबित नाहीत. त्यांनी उप-ठेकेदार म्हणून काम घेतले असावे. मात्र, जिल्हा परिषदेकडे त्याची कोणतीही नोंद नाही'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number