लाच घेताना बांधकाम अधिकारी अटकेत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा विभागाचा कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना ४३ लाखाच्या लाच प्रकरणी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ठेकेदारांनी केलेल्या तीन कोटी रुपयांचा कामाचे बिल मिळावे तसेच मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयांच्या कामांच्या कार्यारंभ आदेश मिळावा म्हणून शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराकडून 43 […]

लाच घेताना बांधकाम अधिकारी अटकेत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा विभागाचा कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना ४३ लाखाच्या लाच प्रकरणी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ठेकेदारांनी केलेल्या तीन कोटी रुपयांचा कामाचे बिल मिळावे तसेच मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयांच्या कामांच्या कार्यारंभ आदेश मिळावा म्हणून शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराकडून 43 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्याचा पहिला हप्ता म्हणून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना पाटील यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडण्यात आले बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टाकणाऱ्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई नंदुरबार लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक राकेश चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

तकारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपयांची एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व या व्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या कामाच्या रक्कमेचे कार्यारंभ आदेश काढावेत, यासाठी त्यांनी महेश पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. तेव्हा त्यांनी बिले काढण्यासाठी १० टक्के तर तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ ते १ टक्का अशा टक्केवारीच्या स्वरुपात एकत्रित ४३ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार नाशिक लाच लुपचत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number