नागपुरात काँग्रेसची सद्भावना यात्रा; प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरकारवर जोरदार टीका

नागपूर जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर समाजात शांततेचा संदेश देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बुधवारी सद्भावना यात्रेचे आयोजन केले.

नागपुरात काँग्रेसची सद्भावना यात्रा; प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरकारवर जोरदार टीका

नागपूर : नागपूर जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर समाजात शांततेचा संदेश देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बुधवारी सद्भावना यात्रेचे आयोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून सद्भावना यात्रेला सुरूवात करण्यात आली. 

नागपूरात आज काँग्रेसकडून सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून सद्भावना यात्रेला झाली आणि रजवाडा पॅलेस येथे यात्रेचा समारोप झाला. काँग्रेसची सद्भावना यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, नरसिंग टॉकिज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक, देवडिया काँग्रेस भवन, भालदारपुरा चौक, गंजीपेठ, गांधी पुतळा या मार्गाने सद्भावना यात्रा पार पडली. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा : अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

 'महाराष्ट्रात कायदा काम करत नसल्याने गुंडागर्दी वाढली' 
सरकारमधील काही बेजबाबदार मंत्र्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याची विधान केली. महाराष्ट्रात कायदा काम करत नसल्याने गुंडागर्दी वाढली आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन महाराष्ट्रात भीती निर्माण झाली आहे. म्हणून सद्भावनेच संरक्षण व्हावे म्हणून काँग्रेसकडून महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म वाचविण्याकरता सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात शांतता नांदावी अशा कार्यक्रमाला सत्ताधारी अडवत असतील तर हे दुर्दैव आहे असेही सपकाळ यांनी सांगितले आहे. 

'काँग्रेसची ही सद्भावना रॅली ढोंग' 
काँग्रेसच्या वतीने नागपुरात सद्भावना रॅलीचे आज आयोजन  करण्यात आले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या रॅलीला विरोध केला. नागपूर पोलिसांनी या रॅलीला परवानगी देऊ नये असे पत्र प्यारे खान यांनी पोलिसांना पाठवले. नागपुरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाल परिसरातूनच सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आले. नागपुरात झालेली दंगल आता लोक विसरलेले आहेत. दंगल झाल्यावर काँग्रेसचे लोक कुठे गेले होते असा प्रश्न प्यारे खान यांनी केला आहे. काँग्रेसची ही सद्भावना रॅली ढोंग असल्याचा आरोप प्यारे खान यांनी केला आहे. 

'प्यारे खान यांच्या तोंडी भाजपाची भाषा'
काँग्रेस पक्षाने काढलेल्या सद्भावना यात्रेला प्यारे खान यानी विरोध दर्शवला आहे. काँग्रसची सद्भावना यात्रा ढोंगी असल्याचे खान यांनी म्हटले आहे. त्यावर प्यारे खान यांच्या तोंडी भाजपाची भाषा असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number