भाई जगतापांना जिंकून आणण्यासाठी काँग्रेसची कसरत

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या दहाव्या जागेसाठी विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

भाई जगतापांना जिंकून आणण्यासाठी काँग्रेसची कसरत

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, विधानसभेच्या दहाव्या जागेसाठी विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना जिंकून आणण्यासाठी काँग्रेसची तारेवरची कसरत सुरू असून काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान १००टक्के झाले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकात हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड अशी आहे. त्यामुळे निवडणूकीत भाई जगताप यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. भाई जगताप यांना विजयीसाठीची आवश्यक ८ मतांसाठी काँग्रेस जुळवाजुळव करत आहे. तर दहाव्या जागेसाठी भाजप उमेदवार प्रसाद विजयी होण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number