BMC Election : मोठी घोषणा!; मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, मविआ-मनसे समीकरण बनलं गुंतागुंतीचं

वडेट्टीवार म्हणाले, “जिंकणं हा आमचा मुख्य उद्देश नाही. आमचा उद्देश आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि त्यांना निवडणुकीत संधी मिळवून देणं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.&quot

BMC Election : मोठी घोषणा!; मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, मविआ-मनसे समीकरण बनलं गुंतागुंतीचं

मुंबई: महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी मैदानात उतरायची तयारी सुरू केली असून यंदाच्या निवडणुका अनेक नव्या समीकरणांची साक्षीदार ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या चर्चांना आता वेगळं वळण मिळालं आहे, कारण काँग्रेसने स्पष्टपणे सांगितलं आहे की ती मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेनं राजकीय चर्चांना नवं वळण दिलं आहे. “मुंबई ही जगातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. आमच्या स्थानिक नेत्यांनी ठरवलं आहे की काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढेल,” असं वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, “आमच्या नेत्यांनी हायकमांडशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे. मतांचं विभाजन होईल असं मला वाटत नाही, कारण आम्ही नेहमी 30 ते 35 जागांवर विजय मिळवत आलो आहोत. महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत असताना आमच्या स्वतंत्र लढ्याची चिंता कुणाला वाटते हेच समजत नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

हेही वाचा: BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे-मनसे युती शक्य? आरक्षण सोडतीनंतर होणार सगळंच चित्र स्पष्ट

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “जिंकणं हा आमचा मुख्य उद्देश नाही. आमचा उद्देश आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि त्यांना निवडणुकीत संधी मिळवून देणं. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे प्रत्येकाला राजकीय संधी मिळायला हवी. आम्ही स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेऊ, मात्र समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही तो विचारात घेऊ.” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, “जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती केली आणि त्यांच्या बाजूने प्रस्ताव आला, तर मुंबई काँग्रेस त्या प्रस्तावावर विचार करेल. शरद पवारांचा प्रस्ताव आला तरी आम्ही त्यावर चर्चा करू. मात्र, सध्या आमचा ठाम निर्णय आहे, काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार.” या विधानानं मुंबईतील मविआ-मनसे युतीबाबतची शक्यता आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये मात्र वेगळी राजकीय हवा वाहताना दिसतेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते एकत्र पत्रकार परिषदेत दिसले. नाशिकमधील नेत्यांनी स्पष्ट केलं की, “भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि जातीय तणाव वाढला आहे. येत्या निवडणुकीत आम्ही सर्वजण एकत्र येऊन महायुतीचा पराभव करू.”

एकूणच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रातील नव्या युतींच्या आणि जुनी पक्षांतर्गत मैत्री तुटण्याच्या प्रसंगांसह रणभूमीवर रंगणार आहेत. मुंबईत काँग्रेस स्वाबळवर मैदानात उतरणार असताना, नाशिकमध्ये मात्र विरोधकांची संयुक्त मोहीम भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोहरे मांडले गेले आहेत. आता खेळी कोण जिंकतो, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा: America Shutdown Impact : शटडाऊनचा फटका ! अमेरिकेत हवाई वाहतुकीवर परिणाम, 2100 उड्डाणे रद्द, 7000 पेक्षा अधिक…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number