Raigad News : दक्षिण रायगडमध्ये भाजपची ताकद वाढणार; काँग्रेसच्या उपजिल्हाध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

रायगड : रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंचांनी तसेच कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार प्रवीण दरेकर, निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर, बापुसाहेब […]

Raigad News : दक्षिण रायगडमध्ये भाजपची ताकद वाढणार; काँग्रेसच्या उपजिल्हाध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

रायगड : रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंचांनी तसेच कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार प्रवीण दरेकर, निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर, बापुसाहेब सोनगिरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; पगार 67 टक्क्यांनी वाढणार? मोठी अपडेट समोर

या सर्व कार्यकर्त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा उचित सन्मान राखला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निजामपूरचे स्वप्नील शिर्के, वावे दिवालीचे माजी सरपंच शरद कदम, निलजचे माजी सरपंच प्रमोद जाधव, शिखलीचे माजी सरपंच विजय नलावडे, सयाजी नलावडे, अ‍ॅड. रुपेश वाढवळ, अनंत मोरे, गजानन चव्हाण, प्रकाश शिंदे, प्रताप कडू, समीर म्हसकर आदी असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number