कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार की भाजपा सत्तेत कायम राहणार याचा फैसला शनिवारी ठरणार आहे. कर्नाटकातील २२४ जागांसाठी १० मे रोजी निडवणूक झाली होती. या निवडणूकीत ७२.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर आता, विधानसभेवर कोणता पक्ष बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २,६१५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आहे. विशेष म्हणजे एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुक लढवत आहे. बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी तयारी पूर्ण झाली असून शनिवार १३ मे रोजी निवडणुकीचा फैसला ठरणार आहे.
कर्नाटकातील २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी ७२.६७ टक्के मतदान
२,६१५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद
सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही
दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल
दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपने कंबर कसली
पंतप्रधान मोदींनी प्रचारात आघाडी घेतली
काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांच्याही प्रचाराचा धडाका