राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी, दोन्ही देशांनी युद्ध सराव सुरू केला आहे. त्यासोबतच, भारत आणि पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूंनी घडामोडी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या संरक्षणाशी संबंधित बैठका सातत्याने होत आहेत. या दरम्यान, अचानक लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पीएमओ कार्यालयात गेले आहेत. ही भेट सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: राजनाथ सिंहांनी जपानी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली

मोदींच्या भेटीला राहुल गांधी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या साऊथ ब्लॉकमधील पीएमओ कार्यालयात उपस्थित झाले होते. यापूर्वी, मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला राहुल गांधी दाखल झाले. ही बैठक सीबीआय संचालकांच्या नियुक्तीबाबत असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेशी संबंधित बैठकांमध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर, संध्याकाळी मोदी विरोधी नेत्यांशी भेटत आहेत. त्यामुळेच, या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत, नेमके काय चर्चा झाली हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.0

हेही वाचा: सीतारामन यांची एशियन डेव्हलपमेंट बँक प्रमुखांसोबत चर्चा

भेटीमागील कारण काय?

या भेटीबद्दल लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी माहिती दिली की, 'ही बैठक सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसाठी आहे. सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसाठी त्रिस्तरीय समिती असते. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष असतात. तर विरोधी पक्षनेते सदस्य असतात. तिसरे सरन्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी या समितीचे घटक असतात. या त्रिसदस्यीय समितीकडून सीबीआय डायरेक्टरची निवड होते. सीबीआय डायरेक्टरचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. पण या बैठकीत भारत-पाक संबंधांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number